
जुलै ते डिसेंबर 2025
मंगळवार ते शुक्रवार | स. 7.45 ते 9.00
ऑनलाईन वर्ग | Zoom द्वारे
लाईव्ह वर्ग | रेकॉर्डिंग मिळेल
मार्गदर्शक

अभ्यासक्रमाची माहिती व्हॉट्सअॅपवर मागवण्यासाठी 9309462627 वर "हिंदू धर्म प्रशिक्षक अभ्यासक्रम" असा संदेश पाठवा.
सर्टिफाइड हिंदू धर्म प्रशिक्षक बना...
हिंदू धर्म समजून घ्या...! हिंदू धर्म लाखो हिंदू बांधवांना समजावून सांगा...!
पार्श्वभूमी
आज भारतात आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त हिंदू धर्माचे लोक राहतात. मात्र त्यांना हिंदू धर्माविषयी पुरेशी माहिती नाही. हिंदू धर्माची मूलतत्त्वे, त्याचे साहित्य, ग्रंथ, इतिहास, संस्कार, संस्कृती, परंपरा, सभ्यता, वैभवशाली आणि पराक्रमी वारसा यांची माहिती नाही. शालेय शिक्षणात किंवा अन्य पद्धतीने हिंदू धर्माविषयी ज्ञान देण्याची, माहिती देण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे मंदिरात गेलो, टिळा लावला, पाडवा, गणपती, दिवाळी असे सण साजरे केली की आम्ही हिंदू आहोत असे वाटते. काही यात्रा केल्या, नामजपाच्या माळा ओढल्या, फारतर वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा केली की आपण हिंदू आहोत याचा साक्षात्कार होतो. तसेच जीवनात काही गंभीर अडचणी आल्या, मग देवाला नवस बोलले, उपास तपास केले, काही कर्मकांडे केली की आपण हिंदू आहोत याची खात्री पटते. खरंतर या अत्यंत वरवरच्या गोष्टी आहेत.
हिंदू धर्म ही सनातन वैदिक जीवन पद्धती आहे. निसर्गाबरोबर आणि चराचर सृष्टी बरोबर संतुलन साधून निःश्रेयस आणि अभ्युदय असा जीवनाचा विकास करणारी विचार पद्धती आहे. जगातील सर्वात प्राचीन सभ्यता आणि संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती आहे. इतर धर्म म्हणजे संप्रदाय आहेत. एक प्रेषित, एक ग्रंथ आणि एक प्रार्थना पद्धती यावर आधारित हे संप्रदाय अत्यंत मर्यादित अर्थाने जीवनाचा विचार करतात. हिंदू धर्म मात्र अनादी अनंत काळापासून चालत आलेला आहे. मात्र गेल्या सुमारे एक हजार वर्षांपासून आधी मुस्लिम आणि नंतर इंग्रजांच्या गुलामगिरीत गेल्याने हिंदू समाज त्याच्या धर्मापासून, गौरवशाली इतिहासापासून आणि परंपरांपासून विन्मुख झाला आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही हिंदू समाज सतत आत्मग्लानी मध्ये राहावा असेच सातत्याने प्रयत्न केले गेले. त्यामुळे हिंदू समाज त्याचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान गमावून बसला आहे. हिंदू समाजाला हिंदू धर्माचे यथार्थ ज्ञान होणे हाच यावर एकमात्र उपाय आहे. तसे ज्ञान त्याला मिळाले की तो पुन्हा सिंहासारखा "स्वयमेव मृगेंद्रता" या वृत्तीने संपूर्ण विश्वामध्ये सन्मान आणि समृद्धी प्राप्त करू शकेल.
या अभ्यासक्रमाची गरज काय आहे ?
1️⃣ हिंदू धर्माचे ज्ञान देणारी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नसल्याने असे ज्ञान देणारी व्यवस्था निर्माण करणे मोठी गरज आहे. त्यासाठी या अभ्यासक्रमाची गरज आहे.
2️⃣ धर्माचे ज्ञान नसल्याने हिंदू समाज आत्मविश्वास गमावून बसला आहे. त्याचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी या अभ्यासक्रमाची गरज आहे.
3️⃣ विश्वाच्या इतिहासात हिंदूंनी अमाप संपत्ती आणि समृद्धी निर्माण केली होती. त्यामुळेच कोलंबस भारताचा शोध घेण्यासाठी बाहेर पडला होता. भारतात घराघरातून सोन्याचा धूर निघत होता. पुन्हा तशी संपत्ती, समृद्धी आणि वैभव निर्माण करण्यासाठी या अभ्यासक्रमाची गरज आहे.
4️⃣ नोकरी, गुलामगिरीच्या, न्यूनगंडाच्या मानसिकतेमधून बाहेर पडण्यासाठी या अभ्यासक्रमाची गरज आहे.
5️⃣ संपूर्ण जगामध्ये हिंदू धर्म आणि संस्कृती याविषयीचे आकर्षण वाढत आहे. अनेक देशांमध्ये मंदिरे उभी रहात आहेत. इतर संप्रदायाचे लोक हिंदू पद्धतीने विवाह करीत आहेत. हिंदू सण - उत्सव साजरे करीत आहेत. अशावेळी हिंदूधर्म ज्ञानाचे तज्ञ निर्माण करण्यासाठी या अभ्यासक्रमाची गरज आहे.
6️⃣ हिंदू समाज हा हतबल आणि असहाय्य आहे, त्याचा कोणी वाली नाही, तारणहार नाही, आश्रयदाता नाही असे सांगितले जाते. याचे कारण त्याला धर्म आणि संस्कृतीचे ज्ञान नाही. त्यासाठी हा अभ्यासक्रम गरजेचा आहे.
7️⃣ संपूर्ण जग आज गोंधळलेल्या परिस्थितीत आहे. विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. युद्धे, हिंसा, आतंकवाद, दिवाळखोरी, जागतिक तापमान वाढ, बेरोजगारी, लोकसंख्येचा विस्फोट इ. अनेक समस्या आहेत. त्यावर हिंदू जीवनपद्धती आणि सनातन शिक्षा पद्धती हाच एकमात्र उपाय आहे. त्याचे ज्ञान सर्वांना व्हावे यासाठी या अभ्यासक्रमाची गरज आहे.
8️⃣ ऐहिक जीवनात प्रगती आणि त्याचबरोबर अध्यात्मिक जीवनाचा विकास हा हिंदू धर्माचा पाया आहे. भारताची ओळख आध्यात्मिकता ही आहे. ही ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी या अभ्यासक्रमाची गरज आहे.
9️⃣ भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आणि विश्वविजयी बनवण्यासाठी, संपूर्ण विश्वामध्ये रामराज्य प्रस्थापित करण्यासाठी या अभ्यासक्रमाची गरज आहे.
अभ्यासक्रम रचना
☑️ प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन - LIVE ऑनलाईन
☑️ मूल्यमापन व परीक्षा : गृहपाठ, तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा, प्रत्यक्ष सादरीकरण
☑️ दोन दिवसीय प्रत्यक्ष मार्गदर्शन सत्र - पुणे येथे
☑️ उजळणीसाठी सर्व सत्राचे रेकॉर्डिंग मिळणार
☑️ स्टडी मटेरिअल
☑️ प्रत्येकाला प्रमाणपत्र | मर्यादित जागा
☑️ आंतरराष्ट्रीय ऍक्रिडिएशन प्राप्त अभ्यासक्रम
या अभ्यासक्रमात आपण काय शिकाल ?
✔️ हिंदू धर्माची मूलतत्त्वे
✔️ वेद, उपनिषदे, पुराण ग्रंथ, रामायण, महाभारत
✔️ हिंदू धर्मातील वैज्ञानिकता
✔️ जीवनाचा सर्वांगीण विकास साधणारी हिंदू जीवनपद्धती
✔️ चार आश्रम, चार पुरुषार्थ आणि निःश्रेयस अभ्युदय
✔️ सण, उत्सव, परंपरा आणि त्यामागचे विज्ञान
✔️ वैयक्तिक संस्कार, सामाजिक संस्कार, धार्मिक संस्कार
✔️ हिंदू धर्म प्रशिक्षक म्हणून मोठी नोकरी आणि व्यवसायिक करिअर संधी
✔️ हिंदू पद्धतीने इव्हेंट मॅनेजमेंट कसे करावे
✔️ प्रशिक्षक कौशल्ये - तंत्र आणि मंत्र
हे कोर्सेस कुणासाठी आहेत ?
1️⃣ 21 वर्षावरील - कोणत्याही व्यक्तीसाठी (महिला / पुरुष) - कमाल वयोमर्यादा नाही. पात्रता : 12वी पास/पदवीधर
2️⃣ ज्यांना चांगल्या आणि सुसंस्कृत कामाचा आनंद घ्यायचा आहे आणि त्यातून चांगली अर्थप्राप्ती करून घ्यायची आहे.
3️⃣ युवक युवती, गृहिणी, निवृत्त, शिक्षक / शिक्षिका, प्रशिक्षक, नोकरदार, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, समाजसेवक, शास्त्रज्ञ, राजकारणी, पुरोहित, मंदिर व्यवस्थापक, सामाजिक आणि शैक्षणिक संस्था चालक, इ.
4️⃣ वर्तमान करिअर बरोबर समांतर करिअर विकसित करणाऱ्यांसाठी
5️⃣ सेकंड इन्कम - पूरक आर्थिक उत्पन्न हवे आहे त्यांच्यासाठी
6️⃣ समाज आणि संस्कृतीच्या हितासाठी, पुढील पिढीच्या भविष्यासाठी काम करू इच्छिणाऱ्यांसाठी
7️⃣ प्रत्येक हिंदू व्यक्तीसाठी, ज्याला यशस्वी जीवन जगायचे आहे त्यांच्यासाठी
8️⃣ देशामध्ये आणि देशाबाहेर विविध देशांमध्ये ग्लोबल करिअर करावयाचे आहे त्यांच्यासाठी...
9️⃣ ज्यांचे या देशावर आणि संस्कृतीवर प्रेम आहे आणि ज्यांना वैभवशाली विकसित भारत बनवायचा आहे, भारताला विश्वगुरू आणि विश्व विजय बनवायचे आहे त्यांच्यासाठी...
या अभ्यासक्रमामुळे कोणते फायदे होतील ?
✔️ सर्टिफाइड सनातन हिंदू धर्म प्रशिक्षक म्हणून काम करता येईल
✔️ हिंदू धर्माच्या रचनेची, इतिहासाची, परंपरांची, लक्षणांची, मूलतत्त्वांची साहित्यांची, बलस्थानची माहिती होईल.
✔️ हिंदू धर्म आणि हिंदू जीवनपद्धती यांच्यातील वैज्ञानिकता समजून घेता येईल.
✔️ हिंदू पद्धतीने इव्हेंट मॅनेजमेंट उपक्रम राबवता येतील. उदा. वाढदिवसाच्या, वर्धापन दिन, विद्या संस्कार, पूजा पद्धती कोणत्या पद्धतीने सण आणि उत्सव कसे साजरे करायचे त्यांचे ज्ञान मिळेल .
✔️ यशस्वी जीवनाची सूत्रे आत्मसात करता येतील. चार पुरुषार्थ, चार आश्रम यातून जीवनाचे नियोजन कसे करायचे ते कळेल
✔️ IACDSC ग्लोबल ॲक्रिडीएशनमुळे जगभर करिअर संधी निर्माण होतील.
✔️ हिंदू धर्म प्रशिक्षक म्हणून शाळा, महाविद्यालये, मंदिरे, सामाजिक संस्था, सांस्कृतिक संस्था, इव्हेंट मॅनेजमेंट संस्था इ. ठिकाणी नोकरी आणि काम करता येईल.
✔️ आपल्या परिसरामध्ये हिंदू धर्म प्रशिक्षण केंद्र सुरू करता येइल. ऑनलाईन वर्ग घेता येतील.
✔️ हिंदू धर्म तज्ञ म्हणून डॉक्टर / वकील / इंजिनिअर याप्रमाणे प्रोफेशनल करिअर करता येईल.
✔️ हिंदू धर्म कोच म्हणून कुटुंबासाठी, संस्थांसाठी आणि कंपन्यांसाठी व्यावसायिक पद्धतीने कार्य करता येतील
✔️ हिंदू धर्माचे यथार्थ ज्ञान देणारी कोणतीही व्यवस्था समाजात उपलब्ध नाही. अशा वेळी व्याख्याता म्हणून, प्रवचनकार म्हणून काम करता येईल
✔️ हिंदू इव्हेंट मॅनेजमेंट असा व्यवसाय करता येईल. तज्ञ म्हणून काम करता येईल
हिंदू धर्म प्रशिक्षक म्हणून करिअर कसे आहे? करिअर संधी कोणत्या आहेत?
1️⃣ हिंदू धर्म प्रशिक्षक म्हणून स्वतः वर्ग चालवू शकता.
2️⃣ विविध मंदिरे सामाजिक संस्था, सांस्कृतिक संस्था, गणेश मंडळे यांच्यामध्ये नोकरी करू शकता. मानद प्रशिक्षक म्हणून काम करू शकता.
3️⃣ व्याख्याता, प्रवचनकार - हिंदू धर्मावर व्याख्याने/ प्रवचने देऊ शकता.
4️⃣ हिंदू इव्हेंट मॅनेजमेंट - हिंदू पद्धतीने वाढदिवस कसे साजरे करावेत, वर्धापन दिन कसे साजरे करावेत, सण उत्सव कसे साजरे करावेत, षोडश संस्कार विवाह, वास्तुशांत, उदकशांत, साठी शांत, सहस्त्रचंद्र दर्शन, इ. इव्हेंट साजरे करण्यासाठी काम करू शकता.
5️⃣ हिंदू लाइफ कोच - जीवनातील विविध समस्यांवर हिंदू पद्धतीने हिंदू धर्मानुसार, हिंदू जीवनपद्धतीनुसार कसा मार्ग काढावा, कसा विचार करावा, सुखी समाधानी जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करू शकता.
6️⃣ शाळा महाविद्यालयांमध्ये हिंदू धर्म प्रशिक्षक - नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२० अंतर्गत आता यूजीसीने हिंदू स्टडीज यासाठी मान्यता दिली आहे. तेथे प्रशिक्षक म्हणून काम करू शकता.
7️⃣ हिंदू समुपदेशक - हिंदू शिक्षा समुपदेशक, हिंदू विवाह समुपदेशक, हिंदू बाल समुपदेशक, हिंदू आरोग्य समुपदेशक, हिंदू धार्मिक/ आध्यात्मिक समुपदेशक, हिंदू संवेदना / दुःख (ग्रीफ) समुपदेशक म्हणून काम करू शकता.
8️⃣ हिंदू परंपरा उपक्रम / शिबिरांचे आयोजन - कन्यापूजन, सामूहिक विवाह, संस्कार शिबिरे, ध्यान शिबिरे, युवा शिबिरे, सामूहिक शांति कार्यक्रम, इ. अनेक उपक्रमांचे आयोजन करू शकता.
9️⃣ हिंदू पर्यटन - यात्रा/ परिक्रमा, कुलदेवता देवी दर्शन, इ. अनेक प्रकारांनी हिंदू ज्ञानावर आधारित पर्यटन व्यवसाय विकसित करू शकाल.
हिंदू धर्म प्रशिक्षकाला करिअर आणि व्यवसायाच्या अक्षरशः लाखो संधी उपलब्ध आहेत. भविष्यात देशात आणि देशाबाहेर फार मोठ्या प्रमाणावर हिंदू धर्म ज्ञानाच्या तज्ञांची गरज लागणार आहे. अशा प्रकारचा हा कदाचित देशातील पहिला अभ्यासक्रम आहे.
हिंदू धर्म प्रशिक्षक म्हणून आर्थिक उत्पन्नाचे पर्याय कोणते आहेत ?
✔️ हिंदू धर्म ज्ञान देणारे ऑनलाइन / ऑफलाइन वर्ग - महिना फक्त रु. १००/- वर्गणी आणि ३०० ते ५०० व्यक्ती सहभागी झाल्या तरी दरमहा ३० ते ५० हजार उत्पन्न मिळू शकेल.
✔️ हिंदू धर्म प्रशिक्षक - किमान मानधन रु. १५ ते २० हजार मिळू शकेल. अनुभव, अभ्यास आणि आत्मविश्वास असेल त्यांना अधिक मानधन मिळू शकेल. देशामध्ये वीस लाखांहून अधिक लहान मोठी मंदिरे आहेत. लाखो धार्मिक संस्था आहेत. अध्यात्मिक संस्था आहेत. गणेश मंडळांसारखी लाखो मंडळे आहेत. त्यांना हिंदू धर्म प्रशिक्षकांची गरज आहे.
✔️ हिंदू इव्हेंट मॅनेजमेंट - चांगली व्यवसाय संधी आहे. व्यावसायिक पद्धतीने केल्यास वर्षाला 6 ते 10 लाख उत्पन्न मिळू शकते.
✔️ व्याख्याता, प्रवचनकार - किमान रू. दोन हजार ते पाच हजार मानधन
✔️ हिंदू लाईफ कोच - हिंदू समुपदेशक हा व्यवसाय सल्लागाराप्रमाणे आहे. वार्षिक चार ते सहा लाख उत्पन्न मिळू शकते.
✔️ हिंदू पर्यटन - वार्षिक आठ ते दहा लाख रुपये उत्पन्न मिळू शकते.
अगणित संधी आहेत. आत्मविश्वास, संवादकौशल्ये, धाडस आणि उपक्रमशीलता असेल तर हिंदू समाज संस्कृतीसाठी चांगले कार्य करता येईल आणि चांगले आर्थिक उत्पन्नही मिळेल.

🟦 अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये :
✴️ ऑनलाईन मार्गदर्शन
✴️ ऑनलाईन परीक्षा
✴️ उपयुक्त स्टडी मटेरीअल आणि संदर्भग्रंथांची माहिती
✴️ केव्हाही रेकॉर्डिंग पाहण्याची सुविधा
अभ्यासक्रम - नियम व अटी
1️⃣ या अभ्यासक्रमातील सर्व सत्रे ऑनलाईन झुम मिटिंग द्वारे आयोजित केली जाणार आहेत.
2️⃣ पुणे येथे दोन दिवसीय मार्गदर्शन व सादरीकरण सत्र होणार आहे. पुणे येथील प्रत्यक्ष सत्रासाठी निवासाची व्यवस्था उपलब्ध नाही. सत्राच्या दिवशी सकाळी नाष्टा व चहा, दुपारचे जेवण व संध्याकाळी चहा या सुविधा उपलब्ध असतील, याची कृपया नोंद घ्यावी.
3️⃣ दिलेल्या वेळापत्रकामध्ये परिस्थितीप्रमाणे बदल करण्याचे अधिकार आयोजक तसेच मार्गदर्शकांकडे आहेत.
4️⃣ अभ्यासक्रमाचे सहभागी शुल्क एकत्रच भरायचे आहे.
5️⃣ एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द करता येणार नाही तसेच भरलेली रक्कम परत करता येणार नाही. वर्ग सुरु होण्याच्या ४ दिवस अगोदर कळवल्यास बदली व्यक्ती देता येईल किंवा भविष्यातील बॅच मध्ये अॅडजस्ट करता येईल.
6️⃣ संपूर्ण माहिती आणि वेळापत्रक इ. वाचून नोंदणी करावी.
7️⃣ एकूण अभ्यासक्रमाचे स्टडी मटेरीयल ई-बुक स्वरुपात दिले जाईल.
8️⃣ सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी न्यायालयीन प्रक्रियेची सीमा, पुणे शहर हे राहील.
अभ्यासक्रम शुल्क व नोंदणी प्रक्रिया
🟫अभ्यासक्रम शुल्क : (स्टडी मटेरियल आणि रेकॉर्डिंग सह)
☑️ शुल्क (भारतातील बांधवांसाठी) : रु. 25,000/-
☑️ 21 मे पर्यंत नोंदणी केल्यास सवलत : रु. 21,000/- फक्त
☑️ शुल्क (भारताबाहेरील बांधवांसाठी) : USD 500/-
🟩 नोंदणी कशी करावी ?
1️⃣ खालील नोंदणीचे बटण क्लिक करा आणि नोंदणी अर्ज भरा.
2️⃣ अर्ज सबमिट झाल्यावर पेमेंट चे प्रकार दिसतील. ऑनलाईन किंवा बॅंकेत ट्रान्सफर करुन रक्कम जमा करा.
3️⃣ ऑनलाईन केल्यास त्वरित पोच ईमेलवर मिळेल. बॅंकेत जमा केल्यास त्याचे डिटेल्स आमच्या व्हॉट्सअॅप वर कळवावे.
4️⃣ अभ्यासक्रम सुरु होण्याच्या २४ तास अगोदर ऑनलाईन वर्गाची लिंक आणि इतर माहिती कळवली जाईल.
Payment Options Available: Online - Debit/ Credit Card, Internet Banking, UPI / Wallets OR Bank Transfer
(EMI Available on Selected Debit / Credit Cards [ Facility by Online Payment Gateway] )
For Students from USA - Fees can be paid through Zelle Code - vmarathiusa@gmail.com
संपर्क
7843083706
9309462627
कार्यालय : द्वारा - विश्व मराठी परिषद - 622, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, हनुमान चौक, डेक्कन जिमखाना, पुणे - 04