संत नामदेवांचे अलौकिक चरित्र, चारित्र्य आणि तत्त्वज्ञान यांचे विवेचन शंकर वासुदेव अभ्यंकर यांनी या पुस्तकात केले आहे. नामदेवांच्या बालपणापासूनची माहिती पुस्तकात येते. त्यांच्याविषयीच्या समज-गैरसमजांवर प्रकाश टाकला आहे. त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार केला, समन्वयाची भूमिका घेतली. राम, कृष्ण व शंकर या तिन्ही दैवतांविषयी असलेला नामदेवांचा भक्तिभावही त्यांनी उलगडला आहे. त्यांच्या अभंगतेमध्ये अन्य पैलूंत त्यांच्या हिंदी पदांपासून रुपकांपर्यंत विविध विषयांचे विवेचन आहे.
नामदेवांची समाजभिमुखता, त्यांचा नीतिबोध, जनसामान्यांविषयीचा कळवळा, संघटनकौशल्य, उपदेशातील ऋजुता या सगळ्यांचे वर्णन वाचावयास मिळते. नामदेवांनी आपली विरागी वृत्ती कधीही टाकली नाही, शांती कधी ढळू दिली नाही, याचे प्रत्यंतर या लेखनातून मिळते. नामदेवांच्या निवडक अभंगांचा समावेश पुस्तकात आहे; तसेच अन्य संतांनी नामदेवांच्या केलेल्या गौरवाची माहिती समजते.
top of page
₹200.00 Regular Price
₹179.00Sale Price
bottom of page